मुंबई पोलिसांकडूनच अर्नब गोस्वामीची केस क्लोज! पालघर साधू मॉब-लिंचिंग आणि बांद्रा रेल्वे स्टेशनवर 'जमवलेल्या' श्रमिकांच्या गर्दी संबंधी रिपब्लिक टीव्ही वरील बातम्या या हिंदू-मुस्लिम दंगली घडवून आणायचे कारस्थान होते, असे आरोप ठेवून राजकीय दबावाखाली केलेली ही कारवाई होती. फक्त सत्ताधाऱ्यांच्या फालतू इगो पायी मुंबई पोलिसांनी कारवाई तर केली, पण १८० दिवसात काहीही पुरावे न मिळाल्याने त्याच पोलिसांवर आता ती कारवाई क्लोज करत आहोत अशी ऑर्डरच काढायची नामुष्की ओढवली आहे. स्कॉटलंड यार्ड पेक्षा खरंच सरस आहेत आमचे मुंबई पोलिस.. पण त्यांचे पॉलिटिकल बॉसेस प्रोफेशनल नसतील आणि स्वतःचे पर्सनल तंटे निपटवायला खोट्या केसेस करायचा दबाव पोलिसांवर आणत असतील, तर अजून काय होणार? सत्यमेव जयते!