Skip to main content

संभाजीराजे बालपण शारीरिक छळ व मृत्यू

बालपण

संभाजी राजांचा जन्म १४ मे इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदरयेथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आई, सईबाईंचेनिधन राजे लहान असताना झाले. त्यानंतर पुण्याजवळीलकापूरहोळ गावची धाराऊ पाटील नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली. संभाजींचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाईयांनी केला. त्यांच्या सावत्र आई, पुतळाबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली.

अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते तसेच ते अनेक भाषेत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मुघली सैनिकांचा संभाजीराजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते स्वराज्यात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.


तारुण्य

इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील लहान बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले.

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात जिजाबाईंचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते.

तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. संभाजीराजांचा महाराजांचे अमात्य अण्णाजी दत्तोंच्या कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले. पण संभाजीराजांना ते मान्य होणे कठीण होते. अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजीराजांच्या विरोधात गेले.

दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले हे केवळ अण्णाजी दत्तोंच्या याच्या सांगण्यावरुन केले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचेसुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले.


शारीरिक छळ व मृत्यू



त्यानंतर संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलशयांना औरंगजेबापुढे बहादुरगड, आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. म्हणून त्यांना अखंड भारतवर्षाने धर्मवीर हे पदवी बहाल केली.

बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. एका बोडक्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे बसवले होते. साखळदंडाने बांधलेले. त्या दोघांच्या अंगावर विदूषकासारखे झिरमिळ्यांचे चट्ट्यापट्टयाचे कपडे चढवलेले होते. संभाजी राजेंचे डोळे फोडणे, कानात शिसे ओतणे, जिभ कापणे या सारख्या शिक्षा फर्मावल्या.गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधलेली होती. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा, कुराणमध्ये सांगितलेल्या आदेशानुसार इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याच प्रमाणे 'तख्तेकुलाह' म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेवून त्याला दोन्ही हात बांधलेले होते. त्या खोड्याला घुंगरे बांधलेली होती अन् त्यावर छोटी छोटी निशाणे चितारलेली होती. .

पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. इथे तुळापूरच्या संगमावर हलाल करावयाचे होते. संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्रकमले काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून रवी जशी फिरवावी, तशा त्या तप्त - लालजर्द सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र आवाज करीत चर्येवरील कातडी होरपळून गेली. सारी छावणी थरारली पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. कवि कलशाचेही डोळे काढण्यात आले.

संभाजी महाराजाना पुढील शिक्षा होती जीभ कापण्याची. औरंगजेबाची तशी आज्ञा होती. दोन हबशी पुढे सरसावले, पण संभाजी राजांचा जबडा काही उखडेना. शेवटी हबशींनी नाक दाबले तसे श्वासासाठी संभाजींचे तोंड उघडले तोच त्यांच्या तोंडात पक्कड घुसवली गेली. त्या पकडीत पकडलेली त्यंची जीभ तलवारीने कापली.


Nilesh diwane
Instagram Nileshdiwane77605
Twitter @Nileshdiwane7


https://www.youtube.com/channel/UCgOn62icXSBMHrUxAn2bVeA

Comments

Popular posts from this blog

विरोधकांकडून भक्तांना नेहमी विचारला जाणारा एक प्रश्न : 'मोदींनी काय केलं?' उत्तर -

विरोधकांकडून भक्तांना नेहमी विचारला जाणारा एक प्रश्न : 'मोदींनी काय केलं?' उत्तर -    हेलो फ्रेंड, क्या आपको पैसे की तत्काल आवश्यकता है? ट्रू बैलेंस से मिनटों में आपके लिए त्वरित ऋण!  📌 आंतरराष्ट्रीय सदस्यता : ● EBRD सदस्यता ● International Energy Agency ● Australia Group ● SCO सदस्यता ● Wassenaar Arrangement ● MTCR सदस्यता ● CREN ● Asian Infrastructure Investment Bank (AIIB) ● International Solar Alliance 📌 सुरक्षा करार : ● अमेरिका सोबत Military Logistic Pact 'LEMOA' ● फ्रांस सोबत Military Logistic Pact 'MLSA' ● साउथ कोरिया सोबत Military Logistic Pact ● जापान सोबत Cross Servicing Agreement 'ACSA' ● ऑस्ट्रेलिया सोबत MLSA pact ● रशिया सोबत Military Logistic Pact ● 'सबांग पोर्ट' इंडोनेशिया पर्यंत ● 'एसोम्शन आइलैंड' वर नौसेना बेस ● 'अगालेगा द्वीप' मध्ये सैन्य बेस ● ओमान मध्ये 'दुक्म पोर्ट'  ● श्रीलंका मध्ये 'त्रिंकोमाली पोर्ट'  ● सिंगापुर सोबत समुद्री लॉजिस्टिक करार ● इज़राइल सोबत व्हाइट शिप...

नागरिकता संशोधन विधेयक 2019 लोकसभा में पास हो गया इस विधेयक की जरूरत क्यों पड़ी इसके लिए प्रत्येक भारतीय को निम्नांकित बातें पढ़नी चाहिए यह बहुत जरूरी है आपकी आंखें खोलने के लिए इसे जरूर पढ़िए

नागरिकता संशोधन विधेयक 2019 लोकसभा में पास हो गया इस विधेयक की जरूरत क्यों पड़ी इसके लिए प्रत्येक भारतीय को निम्नांकित बातें पढ़नी चाहिए यह बहुत जरूरी है आपकी आंखें खोलने के लिए इसे जरूर पढ़िए 🔥भारत मे लोकतंत्र तभी तक जिंदा रहेगा जब तक हिन्दू बहुसंख्यक है। बर्ना किसी भी इस्लामिक देश मे लोकतंत्र का कोई महत्व नही🔥 चर्चा के अंतिम दौर में अमित शाह जी की कही गई बातों के मुख्य अंश-: - गृहमंत्री अमित शाह ने कहा- इस देश का विभाजन धर्म के आधार पर न होता तो मुझे बिल लाने की जरूरत ही नहीं होती. सदन को ये स्वीकार करना होगा कि धर्म के आधार पर विभाजन हुआ है. जिस हिस्से में ज्यादा मुस्लिम रहते थे वो पाकिस्तान बना और दूसरा हिस्सा भारत बना. - नेहरू-लियाकत समझौते में भारत और पाकिस्तान ने अपने अल्पसंख्यकों का ध्यान रखने का करार किया लेकिन, पाकिस्तान ने इस करार का पूरा पालन नहीं किया. - 3 देश पाकिस्तान, अफगानिस्तान और बांग्लादेश के संविधान में इस्लाम को राज्य धर्म बताया है. वहां अल्पसंख्यकों को न्याय मिलने की संभावना लगभग खत्म हो जाती है. 1947 में पाकिस्तान में अल्पसंख्यकों की आबादी 23% थी....

जम्मु-काश्मिर

  जम्मु-काश्मिर मागील 72 तासांत लष्कराने हाती घेतलेल्या मोहिमेत 12 दहशतवादी ठार  JNU आणि पुरोगामी विचारवंतांच्या गोटात 72 दिवसाच्या दुखवट्याची घोषणा.! Link :-  https://zeenews.india.com/india/jk-security-forces-kill-12-terrorists-in-72-hours-in-four-separate-encounters-2354162.html/amp?__twitter_impression=true